#IPL2019 : धोनीचा शंभरावा विजय

जयपुर – शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता आणि वादाने रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 4 गडी राखून पराभव केला.  चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थानवर विजय मिळवला. या विजयासह आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करत 100 सामने जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.

त्याने आतापर्यंत 166 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं आहे. धोनीनंतर कर्णधारपदाची कमान सांभाळत सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा खेळाडू म्हणजे गौतम गंभीर. गंभीरने 129 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं असून त्यातील 71 सामने जिंकले आहेत. पण गंभीरने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

यानंतर तिसरा क्रमांक रोहित शर्माचा लागतो ज्याने 94 सामन्यांपैकी 54 सामन्यांत विजय मिळवला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्ज आणि पुणे रायझिंग वॉरियर्स या दोन्ही संघांचे नेतृत्व केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.