MS Dhoni IPL 2024 : आयपीएलच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. पाच वेळा ट्रॉफी जिंकणारा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा असतील. तो आतापर्यंत एकाही हंगामासाठी बाहेर गेला नाही. वयाच्या 42 व्या वर्षी तो चेन्नईचे कर्णधारपदासाठी सज्ज झाला आहे. मात्र, हा त्याचा शेवटचा सीझन असू शकतो, असे बोलले जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी यावर आपले मत मांडले आहे.
चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम ठेवत काशी विश्वनाथन म्हणाले की, हा त्याचा आयपीएलचा शेवटचा हंगाम असेल की नाही हे फक्त धोनीच सांगू शकतो. एका मुलाखतीत ते म्हणाले, ” मला ते माहीत नाही. बघा, कर्णधाराचा प्रश्न आहे, तो तुम्हाला थेट उत्तरे देईल. तो काय करणार आहे हे तो आम्हाला सांगत नाही. धोनीच्या गुडघ्यावर यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया झाली होती. सध्या तो रिहॅबिलीटेशनवर (rehabilitation) लक्ष्य केंद्रित करत आहे आणि तो आयपीएल 2024 पूर्वी फिट होईल अशी अपेक्षा आहे.
धोनी लवकरच सुरू करणार फलंदाजीचा सराव…
काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या फिटनेसबद्दल सांगितले की, ”आता त्याची प्रकृती चांगली आहे. त्यांने फिटनेसवर लक्ष्य केंद्रीत केलं असून जिममध्ये जाण्यास सुरुवात केली आहे आणि कदाचित येत्या 10 दिवसांत तो नेटमध्येही सराव सुरू करेल. धोनीच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी सीएसके चॅम्पियन बनली होती. त्यांनी गुजरात टायटन्सचा त्यांच्या होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियमवर पराभव केला.
लिलावात चेन्नईने सहा खेळाडू केलं खरेदी…
इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे विजेतेपद कायम राखू पाहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने 19 डिसेंबर रोजी दुबई येथे खेळाडूंच्या लिलावात सहा खेळाडूंना खरेदी केले. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेलसाठी संघाने 14 कोटी रुपये खर्च केले. फ्रँचायझीने अनकॅप्ड भारतीय फलंदाज समीर रिझवीला 8.4 कोटी रुपयांना विकत घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. शार्दुल ठाकूर 4 कोटीसह पुन्हा संघात परतला आहे.