Alyssa Healy Click Photo Of Indian Cricket Team : भारतीय महिला संघाने मुंबईतील वानखेडेवर संपन्न झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहास रचला आहे. महिलांच्या कसोटी सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सने दणदणीत पराभव करत विजय साकारला. हा कसोटी सामना जरी भारतीय महिला संघानं जिंकला असला तरी ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार अॅलिसा हिली हिने केलेल्या कृतीने 140 कोटी भारतीयांसह सर्वाचीच मने जिंकली आहेत.
कर्णधार अॅलिसा हिली हिनं नेमकं असं काय केलं ते जाणून घेऊ या…..
भारतीय संघाच्या विजयानंतर मैदानात एक सुंदर नजारा दिसला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिली टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय कॅमेऱ्यात कैद करताना दिसली. मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू ट्रॉफीसह आनंद साजरा करत होते, त्याचवेळी अॅलिसा फोटोग्राफर म्हणून तिथे आली आणि तिने भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयाचे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात टिपले. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Alyssa Healy, what a woman 🫶#INDvAUS pic.twitter.com/x4ZzAYjRU8
— Australian Women’s Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) December 24, 2023
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 11 कसोटी सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. सहा कसोटी अनिर्णित राहिल्या आणि आता भारताला एक विजय मिळाला. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिली दु:खी न होता भारतीय संघाच्या आनंदात सामील होताना दिसली. तिने भारतीय महिला संघाचे ट्रॉफीसह आनंद साजरा करतानाचे क्षण कॅमेऱ्यात टिपले. यातून तिने खिलाडूवृत्ती दाखवून दिली. ऑस्ट्रेलियन महिला कर्णधार अॅलिसा हिलीच्या या स्वभावाचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहे.
फोटो सोशल मीडियावर झाले. व्हायरल..
Peak legend gesture from Alyssa Healy 🫶
A historic celebration for #TeamIndia, through the lens of the Aussie captain! pic.twitter.com/LTPH7QMImc
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 24, 2023
त्याचवेळी, यानंतर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट आणि भारतीय महिला संघाच्या अधिकृत X खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे खेळाडू ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. आणि हे क्षण अॅलिसा हिली कॅमेऱ्यात कैद करत आहे. ऑस्ट्रेलियन महिला कर्णधाराचा या स्वभावाचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहे. तसेच तिचा फोटो काढतानाचा हा अंदाज सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच हा फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Spirit of Cricket 🤝
Australia Captain Alyssa Healy on that gesture to click a special moment, ft. #TeamIndia 📸 👏#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PJ6ZlIKGMb
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2023
टीम इंडियाने पहिल्यांदाच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा केला पराभव..
भारताने पहिल्या डावात 406 तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 261 धावा केल्या. भारताला 75 धावांचे लक्ष्य मिळाले. अन् भारतानं हे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण केले. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे.