Live Cricket Score, RR vs RCB Indian Premier League 2024 : आज, IPL 2024 च्या 19 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी (RCB) झाला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला आहे. जोस बटलरने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 19.1 षटकांत 4 गडी गमावून 189 धावा करत हा सामना जिंकला. राजस्थानचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे, तर आरसीबीने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे.
राजस्थानकडून बटलर आणि सॅमसनने दमदार कामगिरी केली. बटलरने 58 चेंडूंचा सामना करत नाबाद 100 धावा केल्या. त्याने 9 चौकार आणि 4 षटकार मारले. सॅमसनने 69 धावांची खेळी केली. आरसीबीकडून गोलंदाजी करताना रीस टोपलीने 2 बळी घेतले. यश दयाल आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
4⃣ wins in 4⃣ matches for the @rajasthanroyals 🩷
And with that victory, the move to the 🔝 of the Points Table 😎💪
Scorecard ▶️ https://t.co/IqTifedScU#TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/cwrUr2vmJN
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2024
तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कोहली आणि फाफ डुप्लेसिसने पहिल्या विकेटसाठी शानदार शतकी भागीदारी करून सॅमसनचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. या दोन फलंदाजांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर आरसीबीने 20 षटकांत 3 बाद 183 धावा केल्या.
Innings Break!
A brilliant 113* from @imVkohli guides @RCBTweets to a total of 183/3 after 20 overs.#RR chase coming up shortly. Stay tuned!
Scorecard – https://t.co/lAXHxeYCjV #TATAIPL #IPL2024 #RRvRCB pic.twitter.com/mB5FEUbjhh
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2024
आरसीबीकडून विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. कोहलीने 72 चेंडूंचा सामना करत नाबाद 113 धावांची खेळी केली. कोहलीने या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याने फाफ डू प्लेसिससोबत शतकी भागीदारीही केली. डुप्लेसिसने 33 चेंडूंचा सामना करत 44 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. कॅमेरून ग्रीन 5 धावा करून नाबाद राहिला. तर ग्लेन मॅक्सवेल 3 चेंडूत 1 धाव काढून तर आयपीएलमध्ये आरसीबीसाठी पदार्पण करणारा सौरव चौहान 6 चेंडूत 9 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहलने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 34 धावा देत 2 बळी घेतले. नांद्रे बर्गरने 4 षटकांत 33 धावांत 1 बळी घेतला. याशिवाय एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. आवेश खान चांगलाच महागात पडला. त्याने 4 षटकात 46 धावा दिल्या.