लखनौ – चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. सीएसके च्या फिरकीपटूंनी खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करताना एलएसजी चा निम्मा संघ 44 धावांत माघारी पाठवला होता. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांची अर्धशतकी भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली.
आयुषने वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि संघाला 19.2 षटकांत 7 बाद 125 धावांपर्यंत पोहोचवले. मात्र पावसाच्या हजेरीमुळे ही मॅच बराच वेळ थांबली होती आणि अखेर 7 वाजता ती रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुणावर समाधान मानावे लागले आहे.
दरम्यान, आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्या फिल्डिंग करताना लखनौचा कर्णधार केएल राहुलला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर आता आजच्या सामन्यात तो खेळणार नाही. त्यामुळं लखनौ सुपरजायंट्चं कर्णधारपद कृणाल पांड्याकडे देण्यात आलं आहे.