रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढणार

आगामी काळात रिअल इस्टेट सेक्‍टरमध्ये बूम येण्याची आशा आहे. त्यामुळे रिअल्टी कंपनीशी निगडीत कंपन्यांच्या शेअरमध्ये दोन-तीन वर्षात चांगला परतावा मिळण्याची शक्‍यता आहे.

येत्या काही महिन्यांत रिअल इस्टेट सेक्‍टरमध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. अर्थात गुंतवणूकदारांनी दोन-तीन वर्षाचे ध्येय ठेवायला हवे. गेल्या काही वर्षांपासून रिअल्टी इस्टेट सेक्‍टर हे मंदीचा सामना करत आहेत. मात्र आता नवीन सरकार आल्यानंतर या सेक्‍टरचे चित्र बदलेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात रिअल इस्टेट शेअरमध्ये चांगली वाढ होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर रिअल इस्टेट सेक्‍टरमध्ये बूम येण्याची आशा बाळगली जात आहे. या क्षेत्रासाठी सरकारला जी काही पावले उचलायची होती ती उचलली आणि त्यानुसार कार्यवाही झाली. उदा. रेरा कायदा, जीएसटी. त्यामुळे रिअल इस्टेटचे शुद्धीकरण बऱ्यापैकी झाले आहे. ज्या कंपन्यांचा कॅशफ्लो चांगला आहे, बॅलेन्सशिट चांगले आहे, तेथेच गुंतवणुकीचा विचार करावा.

– किर्ती कदम

Leave A Reply

Your email address will not be published.