कार्डिफ – वर्ल्डकप स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने गोलंदाजानी श्रीलंकेच्या फलंदाजाची अक्षरश: दाणादाण उडवत श्रीलंकेला अवघ्या 136 धावांत गुंडाळलं आहे. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मैट हैनरी आणि लाॅकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
Boom 💥
The Sri Lankan innings is wrapped up in 29.2 overs, with #DimuthKarunaratne carrying his bat for a valiant half-century to get them to 136! #BACKTHEBLACKCAPS have to chase just 137 for victory. #NZvSL LIVE 👇 https://t.co/MrREhVpUCG pic.twitter.com/2frOBYazNq
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 1, 2019
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने टाॅस जिकंत गोलंदाजीचा निर्णय घेत श्रीलंकेच्या संघास प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघास 29.2 षटकांत सर्वबाद 136 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली, त्यामुळं न्यूझीलंडला विजयासाठी 50 षटकांत केवळ 137 धावाचं आव्हान मिळालं आहे.
श्रीलंका संघाकडून फलंदाजीत दिमुथ करूणारतने याने सर्वाधिक नाबाद 52 धावा केल्या. तर कुसल परेराने 29 आणि थिसारा परेराने 27 धावा केल्या. श्रीलंकेचे तीन फलंदाज कुसल शुन्यावर बाद झाले, यामध्ये कुसल मेंडिस, एंजलो मैथ्यूज, इसुरू उदाना या फलंदाजाचा समावेश आहे.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मैट हैनरी याने 7 षटकांत 29 धावा देत 3 तर लाॅकी फर्ग्यूसन याने 6.2 षटकांत 22 धावा देत 3 गडी बाद केले. ट्रेटं बोल्ट, काॅलिन डी ग्रैंडहोम, जिमी नीशम आणि मिचेल सैंटनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.