पुणे : शहर पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भिमराव काळे आणि यश सादु बोराटे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने गडचिरोली येथे विशेष सेवा बजावल्याबद्दल आंतरिक सुरक्षा पदक देऊन गौरविले आहे. दत्तात्रय काळे आणि यश बोराटे हे दोघेही सध्या बिबवेवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
दत्तात्रय काळे हे 2013 च्या बॅचचे पोलिस उपनिरीक्षक असून, 2014 ते 2017 या कालावधीमध्ये ते गडचिरोली येथे विशेष अभियान पथकात कार्यरत होते. काळे यांना 2013 साली मुंबई येथे कमांडो फोर्स न येथील कामगिरीबद्दल विशेष पदकाने गौरवण्यातआले होते. तसेच, 2017 साली राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, 2018 साली पोलिस महासंचालक पदक आणि याच वर्षी गडचिरोली येथील विशेष कामगिरीसाठी विशेष पदकाने गौरवण्यातआले होते.
यश बोराटे हे 2015 च्या बॅचचे पोलिस उपनिरीक्षक असून, ते गडचिरोली येथे तीन वर्षे कार्यरत होते. त्यांना गडचिरोली येथील कामगिरीसाठी विशेष व खडतर सेवा पदकाने गौरवण्यात आले. तसेच, 2019 साली पोलिस महासंचालकानेदेखील त्यांना सन्मानित करण्यातआले होते.