मुंबई, – भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने खडसेंना 50 हजारांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी एकनाथ खडसे न्यायालयात हजर होते.
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधातही सेशन्स कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अटकेची शक्यता होती. मात्र, मंदाकिनी खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची ग्वाही दिल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.
त्यानंतर आता एकनाथ खडसे यांचाही जामीन मंजूर झाल्यामुळे खडसे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.