तवांग (अरुणाचल प्रदेश) – पुढील दलाई लामांच्या निवडीमध्ये सहभागी होण्याचा चीनला कोणताही अधिकार नाही, असे अरुणाचल प्रदेशमधील तवांग मठाचे प्रमुख ग्यांगबुंग रिंपोचे यांनी म्हटले आहे. विशेषतः चीनला धर्मावर विश्वास नाही आणि धार्मिक उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे धार्मिक असल्यामुळे चीनला या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा कोणताही अधिकार नाही असे ते म्हणाले.
चीनच्या विस्तारवादी धोरणाला विरोध करायला हवा. त्यासाठी भारत सरकारने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बारिक लक्ष ठेवायला हवे, असेही रिंपोचे यांनी म्हटले आहे. तवांग मठ हा तिबेटची राजधानी ल्हासातील पोतला मठानंतरचा जगातील सर्वात मोठा बौद्ध मठ आहे.
पुढील दलाई लामांची न्विड करण्याचा अधिकार केवळ विद्यमान दलाई लामा आणि तिबेटच्या नागरिकांनाच आहे. यासंदर्भातील चीनचा कोणताही दावा तिबेटी नागरिक कधीही मान्य करणार नाहीत. तिबेटी परंपरांवर वर्चस्व गाजवण्याचा चीनचा प्रयत्न तिबेटला मान्य असू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.