उत्तर प्रदेशातील कानपुर परिसरातील इंजीनियरिंग (BTech) विद्यार्थाने आपल्याच कोचिंगच्या टीचरचा अश्लील व्हिडिओ फेक अकाउंटवर इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. अपलोड करताच हा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला, व्हिडिओबाबत कळताच टीचरने परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. ( BTech student posted teachers obscene video on Instagram )
पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी तपास सुरु केला आणि प्रकरणात एका इंजीनियरिंग (BTech) विद्यार्थाला अटक केली आहे. हे प्रकरण कानपुर येथील काकदेव येथील आहे. मिळाल्या माहितीनुसार परिसरात एक कोचिंग इंस्टिट्यूट आहे. कोचिंग इंस्टिट्यूटमधील टीचर इंस्टाग्रामचा वापर करत नाही. मात्र सोशल मीडियावर अप्सवर त्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे त्यांना कळाले संबंधित संपूर्ण माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली. पोलिसांना प्रकरणात फेक इंस्टाग्राम के आईपी एड्रेस शोधून काढला असता हा नमन नावाचा मुलाचे असल्याचे समोर आले.हा नमन नावाचा मुलगा इंजीनियरिंग (BTech) विद्यार्थी आहे.
त्यानंतर पोलिसांनी नमनला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला हे सर्व करण्यामागचे कारण विचारले असता तो म्हणाला की तो त्या शिक्षकाचा माजी विद्यार्थी आहे. त्याला शिक्षक आवडत नव्हते. त्याला त्यांच्याकडून सूड घ्यायचा होता. त्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कट रचला. त्याने शिक्षकाचा फोटो वापरून अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो इंस्टाग्रामवर अपलोड केला.
पोलीस सध्या या प्रकरणात तपास करत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकालाही प्रश्न पडला आहे कि त्याच्या माजी विद्यार्थाने असं का केले असावे. आणि तो कुठल्या गोष्टीवरून नाराज होता कि त्याने असा गुन्हा केला असावा. ( BTech student posted teachers obscene video on Instagram )