नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी नुकतीच ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर एकत्र येऊन जाळपोळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गाँधी यांना समन्स जारी केला होता. १३ जून रोजी दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. १३ जून आणि १४ जून रोजी चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काल दहा तास चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी बोलवल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
#WATCH | Delhi: Congress workers outside the Enforcement Directorate office burn tires in protest to the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case. pic.twitter.com/eG3Qnq57oX
— ANI (@ANI) June 15, 2022
यावेळी राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असताना कार्यकर्त्यांनी संतप्त होत बाहेर टायर पेटवले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच काही काँग्रेस नेत्यांना घरात कैद करण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
एक राज्यसभा सांसद को इस तरह घर में कैद कर देना कौनसा कानून है?
हमारे राज्यसभा सांसद श्री @DeependerSHooda को इस तरह कैद करके भाजपाई हुकूमत हमें डरा नहीं सकती।
आज हर कार्यकर्ता राहुल गांधी की आवाज़ है और #DeshKiAawazRahul है। pic.twitter.com/ZtiREweDqp
— Congress (@INCIndia) June 15, 2022
काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार देपेंदर हुड्डा यांना पोलिसांनी घरात कैद केले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. एका राज्यसभा खासदाराला अशाप्रकारे कैद करणं कोणता कायद्यात बसतं? काँग्रेस खासदारांना कैद करून भाजपा सरकार आम्हाला घाबरवू शकत नाही. आज प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधींचा आवाज आहे, असे संबंधित ट्वीटमध्ये म्हटले आहे.