दुबई – भारतीय संघाला पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर आणखी एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला या सामन्यात उजव्या हाताला चेंडू लागला होता. त्याच्या हाताचे स्कॅनिंग करण्यात आले असून त्याला या दुखापतीतून पूर्ण बरा होण्यास खूप काळ लागणार असल्यामुळे आता उर्वरित स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 8 चेंडूत 11 धावा केल्या. हातावर चेंडू लागल्यामुळे जखमी झाल्यामुळे त्याला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरता आले नव्हते.