- 77 रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज 102 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 95333 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 102 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच आज चिखली येथील 53 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 77 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 91856 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1942 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 2131 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 754 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 988 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात करोनाने ज्येष्ठाचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि. 20) करोनाने 73 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. करोनाने मृत पावलेला रुग्ण हा पिंपळवाडी-आळेफाटा येथील रहिवाशी आहे. रुग्णालयामध्ये नव्याने 5 महिला व 3 पुरुष रुग्ण हे करोनाबाधित आढळले आहेत. काळेवाडी-आझादनगर, लक्ष्मीनगर, औंध, पिंपळे निलख, रहाटणी येथील हे रुग्ण आहेत. भोर तालुका, औंध आणि अस्थेनिया येथील 3 पुरुष रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. पुणे ग्रामीण परिसरातील एका करोना संशयित रुग्णाला आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयामध्ये सध्या 27 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.