मुंबई – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे आमदार तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मागील दीड वर्षांत किती उद्योग महाराष्ट्रात आणले असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांना केला होता. त्याला उत्तार म्हणून उदय सामंत यांनी आज बुधवारी (13 डिसेंबर) ट्वीटरवर पोस्ट करत उत्तर दिले आहे.
२०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत FDI मध्ये देशात महाराष्ट्र पुन्हा नंबर वन.
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT), भारत सरकार, ने जुलै-सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) अहवाल जारी केला आहे,या तिमाहीत महाराष्ट्राने २८,८६८ कोटी विदेशी… pic.twitter.com/sU7AOgK1gL— Uday Samant (@samant_uday) December 13, 2023
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पोस्ट करत महाराष्ट्रात आलेल्या गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत FDI मध्ये देशात महाराष्ट्र पुन्हा नंबर वन आहे.
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT), भारत सरकारने जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीसाठी अहवाल जारी केला आहे. या तिमाहीत महाराष्ट्राने 28,868 कोटी विदेशी गुंतवणुकीमध्ये आघाडी घेतली आहे. त्यानंतर 12,891 कोटी रुपयांसह गुजरात दुसऱ्या स्थानावर आणि 11,414 कोटी रुपयांसह कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.