नवी दिल्ली – विमानाला होत असलेल्या विलंबामुळे एका प्रवाशाने विमानातील कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्याचा प्रकार इंडिगो विमान कंपनीच्या विमानात घडला. यावेळेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता विमान कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्ती बाबतची माहिती समोर आली आहे. साहिल कटारिया असं या आरोपीचं नाव असून तो पत्नीसोबत हनिमूनला गोव्याला चालला असल्याचं समजते.
आरोपी साहिलबाबत माहिती समोर आली आहे. साहिल आपल्या पत्नीसोबत विमानातून हनिमूनसाठी गोव्याला जात होता. मात्र, पोलिसांनी साहिल कटारियाचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, साहिलच्या लग्नाला पाच महिने पूर्ण झाले आहेत. 28 वर्षीय साहिल दिल्लीत खेळण्याचे दुकान चालवतो.
साहिलला ताब्यात घेण्यात आले, नंतर निर्दोष सोडण्यात आले
साहिलच्या या कृतीवर विमानतळ प्रशासनानेही कारवाई केली. साहिल कटारियाला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवला, ज्यात ‘स्वेच्छेने दुखापत करणे’ आणि फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 41, जे पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्यास परवानगी देते. मात्र, सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपींची निर्दोष मुक्तताकेल्याचे समजते.
A #passenger of a Indigo Flight, punched the captain who was making delay announcement#viralvideo #Indigo pic.twitter.com/snR3tRg4ST
— Rahul Sisodia (@Sisodia19Rahul) January 15, 2024
काय घडलं होत नेमकं त्यावेळी ?
१४ जानेवारी इंडिगोच्या फर्स्ट ऑफिसरने विमानाला विलंब होत असल्याची घोषणा केली. ही घोषणा करीत असतानाच त्याच्यावर साहिल नामक प्रवाशाने हल्ला केला असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.इंडिगोने सांगितले की हा प्रवासी अनियंत्रित झाला होता. त्याला पुढील कारवाईसाठी स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.साहिल कटारिया असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.