सातारा -मलकापूर येथील रेकॉर्डवरील असलेल्या गुन्हेगारांकडून स्थानिक गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस असा एकूण 65 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी कराड शहरातील भाजी मंडई परिसरात ही कारवाई केली.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना कराड शहरातील भाजी मंडई परिसरामध्ये मलकापूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार गौरव सुरेश बनसोडे (वय 22, रा. मलकापूर) येणार असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुमाळ यांच्या निर्देशानुसार मंडई परिसरात सापळा लावला.
मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान प्राप्त माहितीनुसार वर्णन केलेली व्यक्ती आढळून आल्यानंतर पोलिसांनी बनसोडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. झडतीमध्ये त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस असा मुद्देमाल आढळला. त्याच्याविरुद्ध कराड शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गुन्हेगाराच्या विरोधात कराड पोलिस ठाण्यामध्ये कलम 896, 324 आणि 307 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे, मदन फाळके, उपनिरीक्षक यू. सी. दबडे, तानाजी माने, संजय शिर्के, विजय कांबळे,
संतोष पवार, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, अमोल मान,े स्वप्निल माने, मुनीर मुल्ला, अजित करणे, दीपाली यादव, संमती साळुंखे, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, मोसिन मोमीन, रोहित निकम, प्रवीण पवार, संकेत निकम, गणेश कचरे, संभाजी साळुंखे, सुशांत घाडगे यांनी कारवाईत भाग घेतला.