नवी दिल्ली – भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने दुखापतीमुळे अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्मॅम टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतून माघार घेतली आहे. टोरंटो येथे पार पडलेल्या कॅमडा ओपन स्पर्धेदरम्यान सानियाच्या उजव्या कोपराला दुखापत झाली होती.
वैद्यकीय तपासणीनंतर तिची दुखापत गंभीर असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे तिला पूर्ण तंदुरुस्त ठरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी गरजेचा आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
टोरंटो स्पर्धेत मेडिसन किजच्या साथीने सानियाने उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर सानिया मंगळवारी पार पडलेल्या सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेतही खेळल्यामुळे तिची दुखापत वाढली.