भुवनेश्वर : कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे देशातील सर्वात मोठे रुग्णालय ओडिशात उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात एक हजार बेडस्ची सोय असेल. येत्या पंधरवड्यात ते सुरू करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.
देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाग्रस्तांची काळजी घेण्याच्या हेतूने हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात एक हजार बेडस्ची सोय असेल. येत्या 15 दिवसात ते सुरू करण्यात येईल.
देशातील वैद्यकीय क्षेत्रावर वाढलेला ताण काहीसा कमी करण्याच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे, अश प्राथमिकमाहिती हाती येत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे.