नवी दिल्ली – कोरिया येथे 20 मेपासून होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताची स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे संघाचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे. तर गोलकिपर सविता उपकर्णधाराची जबाबदारी पेलणार आहे.
जपान येथे होणाऱ्या एफआयएच महिला सीरीजसाठी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. भारतीय महिला हॉकी संघाने यंदाच्या वर्षाची सुरुवात स्पेन आणि आयर्लंडचा दौऱ्याने केली. स्पेनमध्ये भारताने दोन विजय मिळवित तीन सामने अनिर्णित राखण्यात यश मिळविले होते. तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तसेच मलेशिया दौऱ्यात 4-0 असा विजय मिळविला होता.
भारतीय संघ : गोलकिपर – सविता, रजनी इतिमारपू. डिफेंडर – सलीमा टेटे, सुनीता लकडा, दीप ग्रेस इक्का, करिश्मा यादव, गुरजीत कौर, सुशीला चानू, पुखरंबाम. मिड फिल्डर – मोनिका, नवजौत कौर, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिंज. फॉरवर्ड – राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, लालरेमसियामी, ज्योती आणि नवनीत कौर.