विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर ; केदारची निवड ठरली ऐतिहासिक

मुंबई: सध्या देशात निवडणूक आणि आपीएल वारे वाहत असले तरी जगभरातील क्रिकेट शौकिनांना विश्‍वकरंडक स्पर्धेची उत्कंठा लागली आहे. क्रीडाविश्वातील भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा 30 मे ते 14 जुलै 2019 दरम्यान इंग्लंड व वेल्समध्ये रंगणार असून भारतीय संघाची आज करण्यात आली.

गत स्पर्धेत अजिंक्‍य रहाणे हा एकमेव मराठमोळा खेळाडू होता. यंदा केदार जाधव हा मराठमोळा क्रिकेटपटू प्रथमच विश्‍वकरंडच्या भूमीत झळकताना दिसेल. केदारची निवड ही पुण्यासाठी व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकरीता ऐतिहासिक आहे. कारण तो विश्‍वकरंडक खेळणारा पहिलाच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा खेळाडू ठरणार आहे. प्रथमच पुण्याचा चेहरा विश्‍वकरंडक स्पर्धेत दिसणार आहे. संधीचे सोने करण्यासाठी केदारनेही कंबर कसली आहे. धोनीसोबत मॅचविनरच्यी भूमिका तो ब्रिटिश मैदानातही करताना दिसेल.

जगभरातील 10 संघाची रणधुमाळी मे महिन्याच्या अखेरीस ब्रिटिश भूमीत सुरू होईल. 5 जूनचा भारताची दक्षिण आफ्रिकेची सलामी असली तरी पाकिस्तान विरूध्दची झुंजही भारतासाठी अधिक लक्षवेधी ठरणार आहे. 9 संघाविरूध्द लढा देत 14 जुलै रोजी क्रिकेट पंढरी लॉर्डस्वर भारत खेळताना दिसो व कपिल देवप्रमाणे विराटही लॉर्डस्वर विश्वकरंडक उंचविताना दिसेल.

भारतीय संघ 

 1. विराट कोहली 
 2. रोहित शर्मा 
 3. शिखर धवन 
 4. के एल राहुल 
 5. विजय शंकर 
 6. एम एस धोनी 
 7. केदार जाधव 
 8. दिनेश कार्तिक 
 9. युजवेंद्र चहल 
 10. कुलदीप यादव 
 11. भुवनेश्वर कुमार 
 12. जसप्रीत बुमराह 
 13. हार्दिक पंड्या 
 14. रवींद्र जडेजा 
 15. मोहम्मद शमी 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.