भारतीय शिक्षिकेला चीनी न्यमोनियाची लागण

बिजिंग : चीनमध्ये पसरत असलेल्या सार्स सदृश न्यमोनियाची बाधा एका 45 वर्षीय भारतीय शिक्षिकेला झाली. त्या या विषाणूंची बाधा झालेल्या पहिल्या परदेशी नागरिक आहेत.

प्रिती माहेश्‍वरी या स्नेनझेन येथील आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षिका आहेत, त्या गंभीर आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सार्स सदृश कोरोनाव्हायरसची बाधा झाल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले आहे, असे या शिक्षिकेचा पती अंशुमन खोवाल यांनी सांगितले. या सार्स सदृश असणाऱ्या विषाणूबाबत धोक्‍याची घंटा वाजवण्यात येत आहे. कारण सार्समुळे चीन आणि हॉंगकॉंगमधील 650 जण 2002-03 मध्ये मरण पावले होते.

अंशुमन खोवल हे दिल्लीतील व्यावसायिक आहेत. त्यांनी सांगितले की प्रीती यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्या सध्या व्हेंटीलेटर अणि सपोर्टिंग सिस्टीमवर आहेत. खोवल यांना त्यांना भेटण्याची काही काळ मुभा देण्यात येत आहे. ते म्हणाले, प्रिती सध्या बेशुध्द आहेत. त्यांना बरे होण्यास दीर्घ काळ लागेल, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here