#WrestleRome : गुरप्रीत सिंहने ग्रीको-रोमन प्रकारात पटकावलं सुवर्णपदक

रोम : इटलीमध्ये सुरू असलेल्या रोम रँकिंग सीरिज कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू गुरप्रीत सिंहने ८२ किलो वजनी गटात ग्रीको रोमन प्रकारात सुवर्णपदक पटकावत २०२० वर्षाची सुरूवात धडाक्यात केली आहे. यासह ग्रीको रोमन प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

गुरप्रीतने अंतिम फेरीच्या सामन्यात तुर्कीच्या बुरहान एकबुदकचा ८-५ असा पराभव करत विजय मिळविला. याआधी त्याने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जाॅन वाल्टेरचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत गुरप्रीतने युक्रेनचा कुस्तीपटू दिमित्रो गरदुबै पराभव केला होता.

याशिवाय स्पर्धेत सुनील कुमारने ८७ किलो वजनी गटात रौप्यपदक तर साजन भनवालने ७७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here