भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख खेळाडू सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेलेले आहेत. महत्वाचं म्हणजे यावेळी ऑस्ट्रेलियाला कोणत्याही खेळाडूंच्या पत्नी किंवा परिवार त्यांच्यासोबत नाही. अशावेळी भारतीय संघातील खेळाडूंच्या बायकांनी अनोख्या पद्धतीने करवा चौथ ( Karwa Chauth ) साजरा केला आहे. या दिवशी बायका आपल्या नवऱ्यासाठी उपवास पाळतात आणि रात्री जेव्हा चंद्र दिसतो त्यावेळी पाणी पिऊन हा उपवास सोडला जातो. मात्र खेळाडूंच्या बायकांनी साजरा केलेला करवा चौथ ( Karwa Chauth ) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यावेळी सूर्यकुमार यादव आणि युझवेन्द्र चहल या दोघांच्या पत्नींनी सोबतच हा उत्सव ( Karwa Chauth ) साजरा केला. याबाबतचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचबरोबर चहलची पत्नी धनश्री वर्माने तर थेट व्हिडिओ कॉल करून हा क्षण साजरा केला. त्यांच्या दोंघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सध्या दुखापतीने संघाबाहेर पडलेला दीपक चहर याने देखील आपल्या पत्नीसोबत पहिला करवा चौथ ( Karwa Chauth ) साजरा केला. या क्षणांचा आनंद घेत असताना सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावर अत्यंत हास्य दिसत होते.
View this post on Instagram
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया असून टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याअगोदर त्यांना काही सर्व सामने खेळायचे आहेत. भारताला १७ ऑक्टबरला ऑस्ट्रेलिया आणि १९ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी सराव सामना खेळायचा आहे. यानंतर भारतीय संघ स्पर्धेतील पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी खेळणार आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताचे सामने
२३ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान – मेलबर्न
२७ ऑक्टोबर – भारत वि. A गटातील उपविजेता – सिडनी
३० ऑक्टोबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका – पर्थ
२ नोव्हेंबर – भारत. वि. बांगलादेश – एडलेड
६ नोव्हेंबर – भारत वि. B गटातील विजेता – मेलबर्न
स्पर्धेच्या अंतिम सामना १३ नोव्हेंबरला खेळला जाईल
View this post on Instagram