मेलबर्न : आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीतील अखेरचे आशास्थान असलेल्या रोहन बोपण्णाला युक्रेनची सहकारी नादिया चेनाॅकसह खेळताना पराभवाचा सामना करावा लागला.
Indian challenge at Australian Open ends after Rohan Bopanna and partner Nadiia Kichenok knocked out in mixed doubles quarterfinals. #AusOpen
— Press Trust of India (@PTI_News) January 30, 2020
उपांत्यपूर्व फेरीत रोहन-नादिया या जोडीवर क्रोएशियाच्या निकोला मेकटीक व चेक रिपब्लिकच्या बार्बरा क्रेजिकोव्हा जोडीने ६-०, ६-२ असे पराभूत केले. ही लढत ४७ मिनिटे चालली. या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
दुसरीकडे भारताचा टेनिसपटू लिएंडर पेस आणि लॅटव्हियाची येलेना ओस्टापेन्को या जोडीलाही मंगळवारी मिश्र दुहेरीत दुस-या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.