जामिया परिसरात आंदोलनकर्त्यांवर एका माथेफिरू तरूणाचा गोळीबार
मुंबई: दिल्लीतील जामिया परिसरात सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर एका माथेफिरू तरूणाने गोळीबार केला. या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला. “तुम्हाला आझादी हवी असेल तर मी देतो” असे नारेही या माथेफिरू युवकाने दिल्याचे तिथे उपस्थित असेलल्या लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणावर दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था शाबुत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राजधानी दिल्लीत खुलेआम पिस्तुल हातात घेऊन तरूण फिरत असताना पोलीसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती का, दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था शाबुत आहे का? असे गंभीर प्रश् यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. अभिव्यक्तीस्वांतत्र्यावर असे जाहीर हल्ले करणाऱ्या या विध्वंसक वृत्तीचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेसने नोंदविला आहे.