70 लाखांवर करोना रुग्ण संख्या जाण्याचा अंदाज
हैदराबाद – भारतातील करोना वाढीचा धोका अजिबात कमी झालेला नसून भारतात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच करोनाग्रस्तांची संख्या 70 लाखांवर जाण्याचा धोका आहे.
त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच भारत अमेरिकेला मागे टाकून करोनाग्रस्तांच्या बाबतीत जगातला पहिल्या क्रमांकाचा देश होण्याची शक्यता आहे, असे मत बिट्स पिलानी या संशोधन संस्थेने व्यक्त केले आहे.
आज सकाळीच देशाच्या आरोग्य विभागाने जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार भारतातील करोनाग्रस्तांच्या संख्येने 45 लाखांचा आकडा ओलांडला आहे.
बिट्स पिलानीच्या संशोधकांनी आधुनिक स्टॅटॅस्टिकल तंत्रांच्या मदतीने देशातील करोना ग्रस्तांविषयीचा जो अभ्यास केला आहे त्यात भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 70 लाखांच्यावर जाईल असा निष्कर्ष निघाला आहे.