IND vs SA Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका ( IND vs SA Series ) यांच्यात बुधवारपासून ( २८ सप्टेंबर ) ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाला आफ्रिकेविरुध्द ( IND vs SA Series ) पहिला टी-२० सामना २८ सप्टेंबर, दुसरा सामना २ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबरला मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना खेळायचा आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेत मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुध्द मालिकेत रोहित कंपनीचा वरचष्मा असणार आहे. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक अगोदर भारताकडे ही शेवटची मालिका राहिली आहे. त्यामुळे संघाला आता या मालिकेत विश्वचषकाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊनच मैदानात उतरावे लागणार आहे.
दोन्ही संघांमध्ये टी-२० आणि वनडे अशा दोन्ही मालिका खेळवल्या जाणार आहेत. आशिया चषक आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुध्द्व भारतीय गोलंदाजांची कामगिरी काही सामन्यात अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे भारताला गोलंदाजीवर काम करण्यासाठी ही मालिका अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका – पहिला सामना २८ सप्टेंबर, दुसरा सामना २ ऑक्टोबर, तिसरा सामना ४ ऑक्टोबर
भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका वनडे मालिका – पहिली वनडे ६ ऑक्टोबर, दुसरी वनडे ९ ऑक्टोबर, तिसरी वनडे ११ ऑक्टोबर
भारताचा टी-२० संघ – रोहित शर्मा (कर्णधार) केएल राहुल (उपकर्णधार) विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक) आर अश्विन, युझवेन्द्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नार्किया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, ब्योर्न फोर्टुइन, मार्को यानसेन आणि अँडिले फेहलुकवायो.