India vs South Africa – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना आज लखनऊ येथे खेळाला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार शिखर धवनने पाहिल्यादा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांची कामगिरी आज खूपच सुमार राहिली. सामना सुरु होण्याअगोदर पावसाचा व्यत्यय आल्याने षटकांमध्ये कपात करण्यात आली. त्यामुळे सामना ५० ऐवजी प्रत्येकी ४० षटकांचा सामना करण्यात आला.
पाहुण्या आफ्रिकन संघाने प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २५० धावांच लक्ष्य भारतासमोर ठेवलं. महत्वाचं म्हणजे पदार्पणाच्या सामन्यात फिरकीपटू म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा देण्याचा एक खराब विक्रम रवी बिश्नोईच्या नावावर झाला आहे. त्याने आजच्या सामन्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. बिश्नोईने ८ षटकांच्या स्पेलमध्ये एकूण ६९ धावा दिल्या आणि एक गडी बाद केला.
याअगोदर अशा प्रकारच्या खराब विक्रमाची नोंद विक्रम बिशन सिंग बेदी यांच्या नावावर होती. बेदी यांनी ११ षटकात ६८ धाव दिल्या होत्या. त्याचबरोबर निखिल चोप्रा ६५ धावा दिल्या होत्या. या यादीत वॉशिंग्टन सुंदरही १० षटकांत ६५ धावांवर १ बळीसह या यादीत सामील आहे. त्यामुळे आता या खराब विक्रमाच्या यादीत रवी बिश्नोईंचे नाव एक नंबरवर आले आहे.
🎥 A round of applause as Ruturaj Gaikwad and Ravi Bishnoi make their ODI debuts. 👏👏
Go well! 👍
Follow the match ▶️ https://t.co/d65WZUUDh2#TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/h5mThKwkoS
— BCCI (@BCCI) October 6, 2022