नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यापिठांमधून (international degree) पदवी मिळवणाऱ्यांची संख्या जगभरात भारतात सर्वा आहे.वर्, 2022-23 या शैक्षणिक वर्षात अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 68 हजार 923 इतकी होती, असे “इन्सटिट्युट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन’च्या एका अहवालामध्ये म्हटले आहे. अमेरिकेतून आंतरराष्ट्रीय दर्जाची पदवी मिळवण्यामध्ये भारताने 2009-10 पासून पहिल्यांदाच चीनला मागे टाकले आहे. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सलग तिसऱ्या वर्षात जगभरात सर्वाधिक असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.
“द ओपन डोअर’ (The open Door) नावाच्या या अहवालामध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये गेल्या 3 वर्षात 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत सुमारे 10 लाख परदेशी विद्यार्थी शिकत आहेत. या संख्येत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 25 टक्के असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 दरम्यान भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 63 टक्क्यांनी वाढली आहे. तर 2021-22 मध्ये ही संख्या 16 टक्क्यांनी वाढली होती. अमेरिकेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आपल्या वास्तव्याचा खर्च भागवण्यासाठी तात्पुरत्या नोकरीचा आधार घेतला होता अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांची संख्या चीनपेक्षा (Chaina) जास्त झाली असून आता या यादीमध्ये चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील अमेरिकेचा दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी जून-ऑगस्ट 2023 च्या मुख्य विद्यार्थी व्हिसा हंगामात विक्रमी संख्येने विद्यार्थी व्हिसा जारी केला. 2022 मध्ये याच कालावधीत यात 18% वाढ झाली आहे.