नवी दिल्ली – ओमायक्रॉनच्या धोक्याच्या दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने देशभर पसरू लागला आहे. देशाची राजधानी दिल्ली-मुंबईसोबतच पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्येही बाधितांची संख्या वाढू लागली आहे. देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 750 करोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून या कालावधीत 123 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांबरोबर देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या आता 1 लाख 45 हजार 582 झाली आहे.
India reports 33,750 fresh COVID cases, 10,846 recoveries, and 123 deaths in the last 24 hours
Active cases: 1,45,582
Total recoveries: 3,42,95,407
Death toll: 4,81,893Total vaccination: 1,45,68,89,306 pic.twitter.com/L3NUkNZoFt
— ANI (@ANI) January 3, 2022
या दरम्यान उपचारानंतर 10 हजार 846 लोक करोनापासून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 3 कोटी 42 लाख 95 हजार 407 लोकं करोनामुक्त झाले आहेत. तर, या साथीमुळे आतापर्यंत 4 लाख 81 हजार 893 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशभरात झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या बघून चिंता व्यक्त केली जात आहे. या आकडेवारीवरून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध राज्यांकडून निर्बंध लावण्यात आले आहेत.