नवी दिल्ली – इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा पुढील वर्षी 11 ते 16 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीत अव्वल मानांकित किदम्बी श्रीकांतपुढे सलामीला भारताच्याच सिरील वर्माचे आव्हान असणार आहे.
श्रीकांतला उपांत्य फेरी गाठण्यात यश आल्यास त्याचा जगज्जेत्या सिंगापूरचा लोह किन येवशी सामना होऊ शकेल. तसे घडल्यास श्रीकांतचा जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याची संधी प्रयत्न होईल. जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनचा पहिल्या फेरीत इजिप्तच्या अदहम एल्गामलशी सामना होणार आहे.
महिला एकेरीत ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूचा पहिल्या फेरीत श्री कृष्णा प्रिया कुदारावल्लीचे आव्हान असणार आहे. तसेच सायना नेहवालची वाट खडतर असून उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित इरिस वांग, तर उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित बुसानन ओंगबमरुंगपानशी दोन हात करावे लागू शकतील.