30 उमेदवारी अर्ज कायम
रेडा- इंदापूर विधानसभा निवडणुकीतील नामनिर्देशन पत्राची छाननी शनिवारी (दि. 5) तहसील कार्यालयात करण्यात आली. यामध्ये दोन अर्ज बाद झाले तर 30 अर्ज कायम राहिले आहेत.
अपक्ष उमेदवारी सगाजी मोहन कांबळे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज बाद झाला आहे. कांबळे यांनी अर्जावर दहा सूचकांपैकी काही सुचकांची स्वाक्षरी ऐवजी अंगठे घेतल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. तर श्रीपती महादेव चव्हाण यांनी बहुजन समाज पार्टीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्जासोबत ए बी फॉर्म जोडलेला नव्हता व दहा सूचक नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला.
हर्षवर्धन पाटील (भाजप), दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), गिरीश मदन पाटील (अपक्ष), सविता भीमराव कडाळे (हिंदुस्तान जनता पार्टी), सुरज रामचंद्र वनसाळे (अपक्ष), वैभव सर्जेराव जाधव (अपक्ष), सगाजी मोहन कांबळे (अपक्ष, एक अर्ज बाद), संतोष गणपत शिंदे (अपक्ष), सुधीर अर्जुन पोळ (अपक्ष), कमलाकांत रमाकांत तोरणे (अपक्ष), बाळासाहेब शंकर सरवदे (अपक्ष), रवी अप्पा भाळे (अपक्ष), संदीप भगवान चौधरी (अपक्ष), अमित साहेबराव मोहिते (अपक्ष), कांतीलाल हनुमंत ठोकळे (बहुजन समाज पार्टी), बाबासाहेब दिनकर भोंग (बहुजन मुक्ती पार्टी), हनुमंत नामदेव वीर (अपक्ष), गणेश मधुकर कोकाटे (अपक्ष), सगाची मोहन कांबळे (अपक्ष), दत्तात्रय दशरथ आरडे (अपक्ष), भाऊराव राजाराम झेंडे (अपक्ष), जावेद बशीर शेख (अपक्ष), अंकुश लंड्या काळे (महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, इंडीयन सोशालिस्ट रिपब्लिकन कॉंग्रेस), महादेव गौतम मोहिते (अपक्ष), अमोल अर्जुन मारकड (बहुजन मुक्ती पार्टी), बाळासाहेब विठ्ठल कोकाटे (अपक्ष), संजय ज्ञानदेव कुचेकर (अपक्ष), आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे (अपक्ष), शिवाजी दत्तू आरडे (अपक्ष), सचिन भास्कर जोरे (वंचित बहुजन आघाडी), संभाजी मधुकर चव्हाण (अपक्ष) यांचे अर्ज कायम राहिले आहेत.