IND vs ZIM – टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ मधील भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता विश्वचषकाच्या सेमीफायनल सामान्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानची लढत न्यूझीलंडशी होणार असून भारतीय संघासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. पाकिस्तान-न्यूझीलंड सामना ९ नोव्हेंबरला बुधवारी खेळला जाईल. तर भारत-इंग्लंड सामना १० नोव्हेंबरला गुरुवारी खेळला जाईल.
“आफ्रिकाने पाकिस्तानला लॉटरी मिळवून दिली”, शोएब अख्तरचं वक्तव्य!
भारताने दिलेल्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर झिम्बाब्वेला पहिला धक्का बसला. भुवनेश्वरने वेस्ली माधवेरेला कोहलीकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर अर्शदीपने रेगिस चकबवाच्या रूपाने भारताला दुसरे यश मिळवून दिले. मोहम्मद शमीने सीन विल्यम्सला ११ धावांवर बाद केले. हार्दिक पांड्याने कर्णधार क्रेग एर्विनला (१३ धावा) बाद केले. मोहम्मद शमीने टोनी मुन्योंगाला (५ धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
झिम्बाब्वेकडून रायन बर्ल ( ३५ धावा ) आणि सिकंदर रजा ( ३४ धावा ) यांच्याव्यतिरिक्त कोणालाही काही खास कामगिरी करता आली नाही.झिम्बाब्वेचा संघ १७.२ षटकांत ११५ धावांवरच सर्वबाद झाला. भारताकडून गोलंदाजीत अश्विनने सर्वाधिक ३ गाडी बाद केले तर मोहमद शमी आणि हार्दिक पंड्या यांनी २-२ बळी घेतले. याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, अर्शदीप आणि अक्षर पटेल यांनी १-१ गडी बाद केला.
सामान्याच्या ( IND vs ZIM ) सुरुवातीला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ५ गडी गमावून १८६ धावा केल्या होत्या. केएल राहुलने सुरूवातीला तर सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकांत चांगली खेळी केली. दोघांनाही अर्धशतके झळकावली. राहुल 35 चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. त्याचबरोबर सूर्यकुमारने २५ चेंडूत ६१ धावांची नाबाद खेळी केली. दोन्ही फलंदाजांनी अखेरच्या षटकांत अविश्वसनीय फटकेबाजी केली. सूर्यकुमारने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. झिम्बाब्वेकडून गोलंदाजीत शॉन विलियम्सने 2 षटकांत 9 धावा देताना सर्वाधिक 2 गडी बाद केले तर ब्लेसिंग मुजरबानी,रिचर्ड एनगरवा आणि सिकंदर रजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.