दक्षिण आफ्रिका ( South Africa ) आणि नेदरलॅंड्स यांच्यात रविवारी सामना खेळला गेला. या सामन्यात अनपेक्षित असा उलटफेर पाहायला मिळाला. नेदरलॅंड्सने दमदार खेळ दाखवत आफ्रिकेला १३ धावांनी पराभवाचा मोठा धक्का दिला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेला टी-२० विश्वचषकातील आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. या महत्वाच्या सामन्यात आफ्रिकेचे पराभूत होणे म्हणजे पाकिस्तानी संघाला मोठी लॉटरी लागल्यासारखे आहे. आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत दडपण सांभाळू शकला नाही. आफ्रिकेच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आफ्रिकन संघाला ‘चोकर्स’ म्हटले आहे.
#T20WorldCup #ZIMvIND : सूर्यकुमारची तुफानी खेळी; भारताचे झिम्बाब्वेसमोर 187 धावांचे लक्ष्य
दक्षिण आफ्रिकेवरील ( South Africa ) नेदरलँडच्या धक्कादायक विजयानंतर अख्तरने त्याच्या ट्विटर खात्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले की, “दक्षिण आफ्रिकेचा संघ खरंच खूप मोठा चोकर्स आहे. तुम्ही चोकर्स आहात कारण तुम्ही पाकिस्तानला लॉटरी लागल्यासारखी संधी दिली आहे. भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाची उपांत्य फेरी गाठण्याची लायकी नव्हती, पण आफ्रिकेने पाकिस्तानला एक संधी, जीवनदान दिले आहे.”
सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ( South Africa ) कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना नेदरलँड्सने २० षटकांत ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाला २० षटकांत ८ गडी बाद १४५ धावाच करता आल्या. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये धमाकेदार फलंदाजी करणारे आफ्रिकेचे खेळाडू आजच्या महत्त्वपूर्ण सामन्यात अपयशी ठरले. आफ्रिकन संघाला पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत ‘चॉकर्स’ असल्याचा शिक्का पुसता आला नाही.
Thank you South Africa. You’ve lived upto the ‘c’ word. Worked in our benefit.
Pakistan, now stay tight. Go on & win this. pic.twitter.com/MCl1oz6ZHC— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 6, 2022