Akash Deep : भारत आणि इंग्लंडविरुद्धचा तीन कसोटी सामन्यांसाठी BCCI कडून भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय संघात वेगवान गोलंदाज आकाश दीप (Akash Deep) याला संधी देण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भन्नाट कामगिरी करणाऱ्या आकाश दीप याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आकाश दीपला आवेश खानच्या जागेवर संघात घेण्यात आले आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामना होणार आहे. पाच सामन्याची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. मात्र आवेश खानच्या जागी संधी देण्यात आलेला २७ वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश दीपला कोण आहे? याची माहिती जाणून घेऊयात..
कोण आहे वेगवान गोलंदाज आकाश दीप?
आकाश दीप मूळचा बिहारचा आहे. एका छोट्या गावातून आलेला आकाश दीपने १६ व्या वर्षी वडिलांना गमावले त्यानंतर सहा महिन्यात त्याच्या भावाचेही निधन झाले. वडील आणि भावाला गमावल्यानंतर आकाश दीपने बहिणीसोबत दिल्ली गाठली. तेथूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळला. क्रिकेटसाठी आकाश दीप याला राज्याही सोडावे लागले. बिहार क्रिकेट असोशिएशनवर बॅन लागल्याने आकाश दीप याने पश्चिम बंगालमध्ये जाऊन नशीब अजमावले.
आकाश दीपचे करिअर
आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्ध आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने ३ सामन्यात सर्वाधिक १३ विकेट घेत आकाशने आतापर्यंत २९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १०३ विकेट घेतले आहेत. एवढेच नाही तर त्याला आयपीएलचा अनुभवही आहे. आकाशने आयपीएलमध्ये खेळलेल्या ७ सामन्यात ६ विकेट घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. तर टी२० मध्ये त्याने ४८ विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजीतील आकाशची कामगिरी पाहूनच निवडकर्त्यांनी त्याचा कसोटी संघात समावेश करू घेतला.
आकाश दीपने ९ मार्च २०१९ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालकडून टी२० मध्ये पदार्पण केले. २५ सप्टेंबर २०१९ ला रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून प्रथम श्रेणीच्या क्रिकेट खेळत रणजीत पदार्पण केले. २७ वर्षीय आकाश दीप याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताच्या वनडे संघातही स्थान मिळाले होते. पण तो पदार्पण करु शकला नाही.
शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (डब्ल्यूके), केएस भरत (डब्ल्यूके) , आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव.