IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना अतिशय रोमांचक झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 307 धावांवर संपला. यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 145 धावांवर आटोपला आणि भारताला 192 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात भारताने पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. चौथ्या दिवशीच सामना संपला. | IND vs ENG 4th Test
चौथ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. | IND vs ENG 4th Test
आज चौथ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता 40 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताला 84 धावांवर पहिला धक्का बसला जेव्हा जो रूटने यशस्वी जैस्वालला जेम्स अँडरसनकरवी झेलबाद केले. त्याला 37 धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्माही कसोटी कारकिर्दीतील 17 वे अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला टॉम हार्टलीने बेन फॉक्सच्या हाती झेलबाद केले. रोहितला 55 धावा करता आल्या.
रजत पाटीदार पुन्हा अपयशी ठरला आणि खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजाही विशेष काही करू शकला नाही आणि चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. | IND vs ENG 4th Test
हार्टलेने सलग दोन चेंडूंवर जडेजा आणि सर्फराज खानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सर्फराज खाते उघडू शकला नाही आणि झेलबाद झाला.
एकेकाळी 120 धावांपर्यंत मजल मारून भारताचे 5 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पोहोचले होते. इंग्लिश फिरकीपटू भारतीय संघासाठी मोठे आव्हान बनले होते, पण शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी शानदार भागीदारी करत इंग्लंडचे मनसुबे उद्ध्वस्त केले.
ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 72 धावांची भागीदारी करत विजय संपादन केला. यादरम्यान शुभमनने कसोटी कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले.
भारताकडून दुस-या ङावात
जुरेल 39 धावांवर तर शुभमन 52 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने 55 तर यशस्वी जैस्वालनं 37 धावांची खेळी केली.
इंग्लंडकडून दुस-या ङावात शोएब बशीर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जो रुट आणि टॉम हार्टली या दोघांना 1-1 विकेट मिळाली.