PM Modi। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे देशभरातील 554 रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यावेळी त्यांनी ‘आज भारताने छोटी स्वप्ने पाहणे बंद केले आहे. आम्ही मोठी स्वप्ने पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करतो. हा निर्धार या विकसित भारत, विकसित रेल्वे कार्यक्रमात दिसून येतो.” असे मोदी म्हणाले.
अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे उद्घाटन तसेच पायाभरणी करण्यात आली. मुंबईतील चर्नी रोड स्टेशन परिसरातील रेल्वेच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ जूनपासून सुरू PM Modi।
पंतप्रधान पुढे म्हणाले की, देशात वेगाने काम सुरू आहे. आज रेल्वेशी संबंधित दोन हजारांहून अधिक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ एकाच वेळी झाला. सध्या मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ (Third Term) जूनपासून सुरू होत आहे. आतापासून ज्या गतीने काम सुरू आहे. ती सर्वांना चकित करणार आहे. ते म्हणाले की, अनेक दशकांपासून रेल्वेला स्वार्थी राजकारणाचे बळी व्हावे लागले. आज रेल्वे हा प्रवास सुलभतेचा एक भाग बनला आहे. आज रेल्वे मोठ्या बदलाच्या काळातून जात आहे.
तुमचे स्वप्न, तुमची मेहनत आणि मोदींचा संकल्प PM Modi।
तुमचे स्वप्न, तुमची मेहनत आणि मोदींचा संकल्प हीच विकसित भारताची हमी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. वंदे भारतसारख्या सेमी हायस्पीड ट्रेनचा विचार कोणत्याही सरकारने केलेला नाही. दशकभरापूर्वी याची कल्पना करणेही अवघड होते. दशकभरापूर्वीपर्यंत रेल्वेतील स्वच्छता स्थानकावर स्वच्छता ही मोठी गोष्ट मानली जात होती. आज हे सर्व दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. विमानतळासारख्या आधुनिक सेवा फक्त श्रीमंतांसाठीच उपलब्ध आहेत. आज गरीबांना रेल्वेवर विमानतळासारख्या सुविधा मिळू शकतात.