आॅकलंड : यंदाच्या वर्षातील पहिल्याच विदेशी दौ-यात भारताने न्यूझीलंडविरुध्द शुक्रवारी टी-20 मालिकेची विजयाने सुरुवात केली. या पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर आज दुसरा टी-20 सामना होत आहे. न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाने आजच्या सामन्यात कोणताही बदल केला नसून पहिल्या सामन्यातील विजयी संघच कायम ठेवला आहे. शार्दुलच्या जागी नवदीप सैनीचा समावेश करण्याची शक्यता होती मात्र विराटने संघात कोणताही बदल केलेला नाही.
2nd T20I. India XI: R Sharma, KL Rahul, V Kohli, S Iyer, S Dube, M Pandey, R Jadeja, S Thakur, Y Chahal, M Shami, J Bumrah https://t.co/q1SS95nfkl #NZvInd
— BCCI (@BCCI) January 26, 2020
भारतीय संघ : रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, युज़वेंद्र चहल, मोहम्मद शमी
दुसरीकडे न्यूझीलंड संघास सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे त्याच्या संघात बदल होईल अशी शक्यता होती मात्र, केन विल्यमसनने संघात कोणाताही बदल केलेला नाही.
2nd T20I. New Zealand XI: M Guptill, C Munro, K Williamson, C de Grandhomme, R Taylor, T Seifert, M Santner, T Southee, I Sodhi, B Tickner, H Bennett https://t.co/q1SS95nfkl #NZvInd
— BCCI (@BCCI) January 26, 2020
न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, टिम सीफ़र्ट, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, टिम साउदी, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर, हेमिश बेनेट
दरम्यान, इडन पार्कमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा टी-२० सामना होत असून आतापर्यंतचे दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघात हा तेरावा टी-२० सामना होत असून आतापर्यंत चार वेळा भारताने तर आठ वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.