मध्यमवर्गीयात दुसऱ्या घराची वाढती मागणी (भाग-२)

मध्यमवर्गीयात दुसऱ्या घराची वाढती मागणी (भाग-१)

लक्षात ठेवा
दुसरे घर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे त्याची कनेक्‍टव्हिटी चांगली असायला हवी. जेणेकरून ये-जा करणे सोपे राहील. त्याठिकाणी सार्वजनिक परिवहनची सुविधा असावी. पहिल्या घरापेक्षा दुसरे घर अधिक दूर नको. काही तांत्रिक अडचणी आल्यास तेथे विनाअडथळा जाता येईल, अशा ठिकाणी घर खरेदीस प्राधान्य द्यावे. दुसरे घर खरेदी करण्याचा उद्देश लक्षात घ्यावा. दुसरे घर हे स्वत:ला राहण्यासाठी की भाड्याने देण्यासाठी खरेदी करत आहोत, हे अगोदर निश्‍चित करावे. जर सुट्टीच्या काळात काही वेळ घालवण्यासाठी ते घर खरेदी करायचे असेल तर ते शहराबाहेर असणेच हिताचे आहे. भाड्याने देण्यासाठी घर खरेदी केले जात असेल तर घराची मागणी असणाऱ्या ठिकाणी घर खरेदी करावी. शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय आदींजवळील वसाहतीत, कॉलनीत किंवा सोसायटीत दुसरे घर खरेदीचा विचार करावा.

दुसऱ्या घराचे फायदे
शहरापासून दूर स्वत:ची मालमत्ता असेल तर त्याचा फायदा अनेक अर्थाने होतो. आठवड्यातून एकदा किंवा सुट्टीच्या काळात तेथे काही काळ व्यतित करून स्वत:ला ताजेतवाने करता येते. दुसरे म्हणजे दुसरे घर भाड्याने दिल्यास त्यापासून दरमहा नियमित उत्पन्न मिळते. सध्याच्या काळात ज्या वेगाने मालमत्तेचे भाव वाढत चालले आहेत, त्यानुसार उत्पन्नही वाढत आहे. आता सरकारने दुसऱ्या घराच्या खरेदीवरही करात सवलत दिली आहे. त्याचाही लाभ मिळू शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.