मोहितेंच्या अडचणींमध्ये वाढ; कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्‍यता

राजगुरूनगर न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

राजगुरूनगर: खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 19) फेटाळला असल्याने मोहितेंच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. तर मोहिते सध्या कोठे आहेत कोणला माहित नसले तरी ते उच्च न्यायलयाचा दरवाजा ठोठवणार की स्वत:हून पोलिसांसमोर हजर होणार हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे.

मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दिलीप मोहिते यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी (दि. 18) राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांच्या न्यायालयासमोर मोहिते यांच्या बाजूने त्यांचे वकील ऍड. हर्षद निंबाळकर यांनी तर सरकारी पक्षाकडून ऍड. अरूण ढमाले यांनी युक्तिवाद केला. दोघांचेही म्हणणे न्यायाधीश अंबळकर यांनी ऐकून घेत शुक्रवारी (दि. 19) निर्णय देण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार अंबळकर यांनी आज निर्णय देत मोहिते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)