भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडूलकर’ यांना क्रिकेट विश्वातील एक प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मानाच्या ‘Hall of Fame’ मध्ये सचिनला स्थान देण्यात आले आहे. तसेच, सचिन बरोबर यामध्ये दक्षिण अफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज ‘ऍलन डोनाल्ड’ आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी महिला वेगवान गोलंदाज ‘कॅथरीन’ या खेळाडूंनादेखील हा सन्मान देण्यात आला आहे. दरम्यान, हा सन्मान मिळाल्या नंतर सचिनने आपले मत व्यक्त केले.
His cabinet may be full of trophies, but every additional recognition means the world to the Little Master! @sachin_rt spoke to @ZAbbasOfficial after he was inducted into the ICC Hall of Fame. pic.twitter.com/B3bSNq1nEh
— ICC (@ICC) July 19, 2019
यापूर्वी बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना हा सन्मान देण्यात आला आहे.