नवी दिल्ली – देशातील कोविड रूग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत असून गेल्या 24 तासांत देशात 15 हजार 940 नवीन रूग्णांची भर पडली आहे. सध्या कोविडच्या सक्रिय रूग्णांची संख्याही वाढली असून नवीन रूग्ण लक्षात घेता ही संख्या आता 91 हजार 779 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासांत कोविडमुळे 20 रूग्ण दगावल्याने देशातील कोविड मृतांची संख्या आता 5 लाख 24 हजार 974 इतकी झाली आहे. दरम्यान देशातील कोविडचा रिकव्हरी रेट 98.58 टक्के इतका झाला आहे. पॉझिटीव्हीटी रेट 4.39 इतका झाला आहे.
कोविडचे रूग्ण दगावण्याचे प्रमाण 1.21 टक्के इतके आहे. कोविड रूग्णांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा ओलांडल्याची नोंद 25 जानेवारी झाली आहे. सध्या एकूण कोविड रूग्णांची संख्या 4 कोटी 33 लाख 78 हजार 234 इतकी आहे.