नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात आज 3 हजार 195 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 37 हजार 686 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.80 टक्के इतके झाले असून, रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही वाढत असल्याची शुभवार्ता जिल्हा प्रशासनाने आज दिली.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत 2 हाजर 866 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 22 हजार 840 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 1 हजार 608, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 642 आणि अँटीजेन चाचणीत 616 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 188, अकोले 241, जामखेड 91, कर्जत 105, कोपरगाव 30, नगर ग्रामीण 73, नेवासा 40, पारनेर 92, पाथर्डी 97, राहता 38, राहुरी 28, संगमनेर 224, शेवगाव 218, श्रीगोंदा 26, श्रीरामपूर 51, कँटोन्मेंट बोर्ड 49, मिलिटरी हॉस्पिटल 12 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 232, अकोले 22, कर्जत 06, कोपरगाव 08, नगर ग्रामीण 33, नेवासा 10, पारनेर 05, पाथर्डी 03, राहाता 81, राहुरी 08, संगमनेर 162, श्रीगोंदा 08, श्रीरामपूर 25, कँटोन्मेंट बोर्ड 23 आणि इतर जिल्हा 15 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 616 जण बाधित आढळून आले. मनपा 49, अकोले 14, जामखेड 09, कर्जत 72, कोपरगाव 34, नगर ग्रामीण 51, नेवासा 74, पारनेर 29, पाथर्डी 26, राहाता 40, राहुरी 84, संगमनेर 06, शेवगाव 16 श्रीगोंदा 81, श्रीरामपूर 25 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 726, अकोले 199, जामखेड 45, कर्जत 212, कोपरगाव 182, नगर ग्रामीण 255, नेवासा 110, पारनेर 134, पाथर्डी 89, राहाता 204, राहुरी 103, संगमनेर 295, शेवगाव 211, श्रीगोंदा 120, श्रीरामपूर 112, कॅन्टोन्मेंट 126, मिलिटरी हॉस्पिटल 23 आणि इतर जिल्हा 49 अशा रुग्णांचा समावेश आहे.
करोना अपड्ेटस
बरे झालेली रुग्ण संख्या:1,37,686
उपचार सुरू असलेले रूग्ण:22840
जिल्ह्यातील एकूण मृत्यू:1849
एकूण रूग्ण संख्या:1,62,375