खालापूर – कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारली. त्यामुळे राष्ट्रवादीत पक्षप्रवेशासाठी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा सध्या ओघ सुरू आहे. मंगळवारी नंदनपाडा गारमाळ येथील असंख्य कार्यकर्ते, महिलांनी युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे, सरचिटणीस शरद कदम, जिल्हा उपाध्यक्ष एच.आर.पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव, शेखर पिंगळे, माजी पं.स.उपसभापती विश्वनाथ पाटील, महिला तालुकाध्यक्षा प्राची पाटील, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील आदि प्रमुखांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत येथे 29 नोव्हेंबरला कर्जत येथील पोलीस ग्राऊंडवर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी खालापूरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुधाकर घारे यांनी केले आहे. यासंबंधीची माहिती आणि नियोजनासाठी खालापूरातील नव्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नंदनपाडा गारमाळ येथील किरण हिरवे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, महिलांनी युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला.
याप्रसंगी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्राथमिक स्वरूपात कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.