सातारा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तींयांचा असलेला साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. यामध्ये दौड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर, पुष्पगनतेश्वर, नंदुरबार या कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर छापे टाकण्यात आले.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी पसरल्यानंतर राजकिय वर्तुळाल खळबळ उडाली आहे.
आज सकाळी सात वाजता पासून या कारवाईस सुरुवात झाली आहे. ज्या संचालकांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत, ते अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, पोलीस यंत्रणेला कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांच्या मदतीनं ही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.