नवी दिल्ली – आयकर विभागाने बुधवारी हिंदुजा समूहाच्या मुंबई आणि इतर काही शहरांमधील काही संस्थांवर छापे घातले असल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार करचुकवेगिरीच्या तपासाचा एक भाग म्हणून हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून त्यात या समुहाची मुंबई आणि इतर काही शहरांतील कार्यालये कव्हर केली जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
आयटी कायद्यानुसार तपास कामासाठी संबंधीत कार्यालय बंद केले जाते. त्यानुसार तेथे ही कार्यालये बंद केली गेली होती. पीटीआयने हिंदुजा ग्रुपला पाठवलेल्या ईमेलला त्वरित प्रतिसाद मिळाला नाही. सूत्रांनी सांगितले की, आयकर विभागाची ही कारवाई जनरल अँटी-अव्हायडन्स रुल्सच्या तरतुदींशी निगडीत आहे. हिंदुजा समूहात अनेक कंपन्या आहेत. मात्र हे छापे कोणत्या कंपन्यांमध्ये घालण्यात आले याचा तपशील मात्र समजू शकला नाही.