पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने आयोजित ‘१८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ चे उदघाटन गुरुवारी दि. ९ जानेवारी २०२० ला सायंकाळी पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे पार पडले. ‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ या पिफ महोत्सवाच्या ‘थीम’ला अनुसरून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लावणी नृत्य व आदिवासी नृत्य या वेळी सादर करण्यात आले.यावेळी प्रेक्षकांनी आदिवासी नृत्याला टाळ्यांच्या कडकडाटासह भरभरून प्रतिसाद दिला.
महोत्सवाचे उदघाटन सांस्कृतिक कार्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी दीपप्रज्वलन करताना मुरलीधर मोहोळ, रवी गुप्ता, मुक्ता बर्वे, सुबक भावे, डास. जब्बार पटेल देखील उपस्थित होते.