शीना बोरा हत्याकांड प्रकरण
मुंबई – हायप्रोफाइल शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जीचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. पीटर मुखर्जी आपली मुलगी शीना बोराच्या हत्या प्रकरणात सध्या मुंबईच्या कारागृहात आहेत.
Special CBI court rejects bail plea of Peter Mukerjea in Sheena Bora murder case. (file pic) pic.twitter.com/2GNUtmgdSb
— ANI (@ANI) April 4, 2019
या प्रकरणात पीटर मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. २४ एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. २०१५ मध्ये या हत्येचा खुलासा झाला होता. तेव्हा पीटरची पत्नी इंद्राणीचा ड्रायव्हर शामवर राय याला हत्यारे बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. इंद्राणीवर आरोप आहे की, तिने आपला आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपल्या पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली होती. त्यानंतर २५ एप्रिल रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.