नवी दिल्ली : शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला सर्वोच्च न्यायालयाकडून आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल साडेसहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. इंद्राणी मुखर्जीसोबतच तिचा दुसरा पती पीटर मुखर्जीही या प्रकरणात अटकेत होता. काही दिवसांपूर्वीच पीटर मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला होता. इंद्राणीची सावत्र मुलगी शीना बोरा हिच्या हत्या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपाखाली पीटरला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, 2012 साली अलिबागच्या जंगल परिसरात शीना बोराचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेह कुजून गेल्याने त्याची ओळख पटवण्यात बराच वेळ गेला. अखेर दोन वर्षानंतर तो मृतदेह शीना बोराचा असल्याचे उघड झाले होते. या याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते, त्यावेळी सर्वानाच धक्का बसला होता.
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरने दिली होती. गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला. शीनाची हत्या झाली, त्यावेळी इंद्राणी गाडीत असल्याची धक्कादायक माहितीही ड्रायव्हरने दिली. शीनाचा मृतदेह 23 मे 2012 रोजी रायगडजवळ आढळून आला होता. हत्येप्रकरणी आधी शीना आई इंद्राणीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकातामधून अटक झाली होती.
वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजबाहेरुन शीना बोराचे अपहरण करुन कारमध्येच गळा आवळून तिची हत्या केली. वाद मिटवण्यासाठी इंद्राणीने शीनाला मेसेज करुन वांद्र्याला बोलावले होता, असे म्हटले जाते. इंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जी यांनाही अंधारात ठेवल्याचे उघड झाले. पहिलं लग्न लपवण्यासाठी, स्वत:च्या मुलीला बहिण सांगून, इंद्राणीनं पती पीटर यांना अंधारात ठेवलं होतं. इंद्राणीची मुलगी आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचे प्रेमप्रकरण या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, इंद्राणीची मुलगी शीना आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचे प्रेमप्रकरण होते. म्हणजेच, इंद्राणी आणि पीटर या पती-पत्नींच्या मुलांचे आपापसात प्रेमसंबंध होते. त्या माय-लेकीच शीनाचा भाऊ मिखाईल बोरानेही शीना आणि इंद्राणी या माय-लेकीच असल्याचा दावा केला होता.